(MPSC) उमेदवारांनो लक्ष द्या ! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट
तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का!, किंवा परीक्षेच्या तयारीला लागणार आहात का! आणि तुम्ही एमपीएससीच्या संकेतस्थळावर तुमचे ‘प्रोफाईल’ यापुर्वी केले आहे का! अहो, मग आता तुम्हाला संकेतस्थळावरील तुमचे प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी संबंधित विभागांच्या मागणीनुसार आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाने २०१०मध्ये कार्यन्वित केली. प्रणालीच्या विकसन, सुधारणा आणि देखाभालीच्या कामासाठी मेसर्स महाऑनलाइन लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची २०१३मध्ये नियुक्ती केली होती. आता या कामासाठी अन्य संस्थेची नियुक्ती केली आहे.
https://www.esakal.com/education-jobs/mpsc-candidates-will-have-to-update-their-profile-on-website
Authorised Source ; eSakal.com
Zilha parishad CEO